मेकप कॅमेरा एक्शन
रंगभूषा... छायाचित्रण ... अभिनय या क्षेत्रांच्या झगमगत्या वाटेवर पाऊल टाकण्यासाठी धडपडणाऱ्या
तरुणाईला आधाराचा हात देणारं आश्वासक लेखन - मेकअप ... कॅमेरा... अॅक्शन
नाटय चित्रपट सृष्टीतल्या रंगभूषा, छायाचित्रण आणि अभिनय या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना हे पुस्तक
स्पर्श करतं. या तीनही विषयांबद्दल ज्या पद्धतीनं या पुस्तकात माहिती दिली आहे, अशी अन्य कुठे नसेल.
अतुल शिधये यांच्या अनुभवांना, विचारांना तनुजा राहणे यांनी आपल्या सुंदर, सहज भाषेतून तुमच्या
पर्यंत पोहोचवले आहे. अत्यंत सोप्या आणि आपुलकीच्या भाषेत हे पुस्तक संवाद साधतं. क्षेत्र कोणतंही
असो, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्वत:चा विकास कसा घडवावा याचं दिशादर्शन येथे घडतं. त्यामुळेच
प्रत्येक तरुणानं वाचावं, अभ्यासावं असं हे पुस्तक आहे.
चित्रपट सृष्टीतील इतर वाटांकडेही हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं, आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. गेली दोन
दशकं या तीनही क्षेत्रात यश मिळवणारी व्यक्ती ज्या युक्तीच्या गोष्टी सांगते, त्या कळीच्या असतात हे नक्की.