गृहवैद्य- “फॅमिली डॉक्टर” ने गौरवलेले पुस्तक
वैद्य सुयोग दांडेकर ( आयुर्वेदाचार्य ) लिखित “गृहवैद्य” या पुस्तकातील एकूण ३४ प्रकारातील वेगवेगळे आजार, त्यांच्या निर्मूलनासाठी औषधोपचार तसेच आहाराविषयी मार्गदर्शन केलेले आहे.
आयुर्वेदाला ५ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदाचे ज्ञान इंद्राने भारद्वाजमुनींनी दिले. असे मानले जाते भारद्वाजमुनींचा शिष्य अग्निवेश याने सर्व प्रथम हे ज्ञान ग्रंथबद्ध केले.
गृहवैद्य या पुस्तकात घरच्या घरी औषधे तयार करण्याच्या पद्धतीही समाविष्ट केलेल्या आहेत. लहान मुलांना होणाऱ्या आजारा विषयी यात एक स्वतंत्र प्रकरण आहे. सध्या प्रचलित असलेल्या गर्भसंस्कार या संकल्पनेविषयी लेखकाने ३३ व्या प्रकरणात इच्छुकांना मार्गदर्शन केलेले आहे.
लेखकाने गुरुकृपेने मिळालेले ज्ञानाचे भांडार या पुस्तकाद्वारे सर्वांसाठी खुले केलेले आहे. आयुर्वेदातील बहुतेक सर्व घटकांना लेखकाने येथे स्पर्श केलेला आहे.
आयुर्वेद अभ्यासक्रमाचे हे पुस्तक वाचून वाचकाला पत्राद्वारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवता येते. सर्व गृहिणींनी या पुस्तकाचा सखोल अभ्यास करून आपल्या घरातील आयुरारोग्याची काळजी घ्यावी हीच लेखकाची आंतरिक इच्छा आहे.
पुनरावलोकन लिहा