काव्यमयी
आपला आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीन त्या घटनांकडे बघतो, अनुभवतो, मनात ठेवतो किंवा विसरूनही जातो. काही वेळा व्यक्तीही होतो. या अनुभवांना पद्यरूपात मांडण सगळ्यात अवघड. प्रणिता यांनी मात्र ही मांडणी अगदी लीलया केली आहे. नेमक्या शब्दछटातून त्यांनी या अनुभवांना पद्याबद्ध केलंय.
वळीव, गोधडी, अडचण, पुस्तक, भिंगरी, हेतू... हे सगळे आपल्या ओळखीचे शब्द. पण हेच प्रणिताच्या शब्दातून वेगळ्या प्रकारे अर्थवाही होतात. तिच्या कवितात शिवराय, स्वातंत्र्यवीरांची स्मरण आहेत. तसेच मासा आणि माशी सारख्या कवितेतून तिन सहज शब्दात जीवनाच तत्त्वज्ञानही मांडल आहे. मनःभाकरी, रण:निवडुंग या अनोख्या शीर्षकातून या कविता लक्ष वेधून घेतातच, पण त्यातला आशयही मनात ठसतो.
साधी, सरळ, गेय भाषा, शब्दांची सोपी मांडणी आणि अंतस्फुर्त भावना यातून प्रणिताची कविता मनात झिरपत राहते.