You are here

बातम्या

जीवा महाला कादंबरीचे प्रकाशन

(28 Dec) सातारा, २८ डिसेंबर (हिं.स.) : आज व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात मुले सर्वच खेळ खेळतात मात्र ती मैदानात नव्हे तर मोबार्इंलवर. आजच्या जमान्यातला पिढीला व तरुणाईला देश कार्य व देशासाठी जीवाची बाजी देणारे शूर लढवय्ये हे इथलेच होते, व या सर्वांचा इतिहास कळल्याशिवाय घडलेला पराक्रम व इतिहास समजणार नाही. प्रा. डॉ. सुरेश गायकवाड यांनी याच जीवा महाला या कादंबरीचे लेखानातून हा जाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला मैदानाकडे नेहण्याचे काम करणार आहे. असे उद्गार इतिहासाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते व शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे- बानगुडे पाटील यांनी काढले.

‘सुकृत’च्या ‘गृहवैद्य’चे  प्रकाशन

बातमी: लोकसत्ता दैनिक: दिनांक. २१-८-२०१० 

रुचकर तरीही पथ्यकर'चे प्रकाशन

सातारा, दि. १३ (प्रतिनिधी): निरोगी व रोगी अवस्थांमध्ये उपयुक्त खाद्दपदार्थांचा अनमोल खजिना असलेले वैद्द सुयोग दांडेकर लिखित 'रुचकर तरीही पथ्यकर' पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. प्रत्येकाची 'प्रकृती' विचारात घेऊन खाद्दपदार्थांची मांडणी या पुस्तकामध्ये आहे. विशेष म्हणजे आपल्याला सहजरीत्या उपलब्द होतील अश्या साहित्यापासून रुचकर तरीही पथ्यकर पदार्थ बनविता येतील. वेळ व पैसा यांची योग्य सांगड घालून पथ्यकर पदार्थांपासून आरोग्य टिकवता येईल तसेच रुग्णांना पचण्यास सुलभ व पौष्टिक आहार योजना या पुस्तकरूपी खजिन्यात आहे.