You are here

Reviews

घरच्यांसाठी शिका आयुर्वेद

धकाधकीच्या जीवनात आपण मनावर, शरीरावर नको तेवढा ताण देतो आहोत आणि त्यातून आजारी पडू या भीतीने घेरले जात आहोत. तात्कालिक कारणांसाठी ऍलोपॅथीचे औषध घेतल्यावर काही पर्यायी उपचार पद्धती अवलंबावी असा विचार करू लागलो आहोत. निरोगी जीवन जगण्याच्या इच्छेने पुन्हा आपण आयुर्वेदाकडे वळतो आहोत. आपल्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी वैद्याकडे जाऊ लागलो आहोत. त्याचवेळी आपल्या लक्षात येतं, की केवळ वैद्यांनी दिलेली औषधे पुरेशी नाहीत, आपली जीवनशैली आयुर्वेदीय असायला हवी. आपली आजी जे घरचे उपचार करायची ते आयुर्वेदीकच असायचे की! जे कुटुंबात परंपरेने चालत आलेले होते, ते तर आता विसरले गेले आहे.