जीवा महाला कादंबरीचे प्रकाशन
(28 Dec) सातारा, २८ डिसेंबर (हिं.स.) : आज व्हॉटस अॅप, फेसबुकच्या जमान्यात मुले सर्वच खेळ खेळतात मात्र ती मैदानात नव्हे तर मोबार्इंलवर. आजच्या जमान्यातला पिढीला व तरुणाईला देश कार्य व देशासाठी जीवाची बाजी देणारे शूर लढवय्ये हे इथलेच होते, व या सर्वांचा इतिहास कळल्याशिवाय घडलेला पराक्रम व इतिहास समजणार नाही. प्रा. डॉ. सुरेश गायकवाड यांनी याच जीवा महाला या कादंबरीचे लेखानातून हा जाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला मैदानाकडे नेहण्याचे काम करणार आहे. असे उद्गार इतिहासाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते व शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे- बानगुडे पाटील यांनी काढले.