मिसळपाव ऊर्फ मिपा.
सर्वोच्च लोकप्रिय मराठी संकेतस्थळांपैकी एक.
मराठी भाषेतून मुक्तपणे लेखन वाचनासाठी उपलब्ध व्यासपीठ.
हजारो सदस्य, लाखो वाचक आणि चाळीस हजारच्या आसपास असणारे लेख, कथा , प्रवासवर्णनं, कविता, पाककृती, चर्चा, काथ्याकूट, मल्टिमीडिया असा कंटेंटचा खजिना असणारं मिसळपाव डॉट कॉम संकेतस्थळ.
मिपाचा ऑनलाईन दिवाळी अंक २०१२ सालापासून दरवर्षी दिमाखात आणि विनाखंड निघतो आहे. यावर्षी प्रथमच मिपा दिवाळी अंक छापील रुपात आपल्यासाठी सादर झाला आहे. मराठी संकेतस्थळ विश्वात हा पहिलावहिला छापील अंकाचा शुभारंभ असावा.
ऑनलाईन अंकातील निवडक लिखाण, काही एक्सकलुसिव्ह लिखाण आणि मिपाच्या खजिन्यातली काही निवडक रत्नं मिळून हा अंक सिद्ध झालेला आहे. मुद्रित माध्यमातला पहिलाच मिपा अंक असल्याने अत्यंत मर्यादित प्रती निर्माण केल्या गेल्या आहेत, त्या मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्राह्य ठरतील.
Write Review